अपंगांच्या शैक्षणिक, मानसिक, शारीरिक पुनर्वसन कार्य करणाऱ्या घरोंदा वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी बालनाट्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिध्द नाट्यकर्मी श्री. संजय हळदीकर यांनी विद्यार्थ्यांना ३ दिवस मार्गदर्शन केले. देशाचे भविष्य असलेल्या समाजातील सर्व घटकांतील मुलांचे व्यक्तिमत्व समृद्ध व्हावे, त्यांचे मानसिक आरोग्य चांगले रहावे यासाठी श्री. हळदीकर यांनी आपल्या जवळील कला-कौशल्यांचा उपयोग करून बालनाट्य शिबिराची रचना केली आहे. वर्षातील सर्व दिवस भारतभर फिरून बालनाट्य शिबिरे घेत त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य मुलांसाठी समर्पित केले आहे. संस्थेच्या घरोंदा वसतिगृहातील ४ थी ते महाविद्यालयीन गटातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या बालनाट्य शिबिरातून त्यांनी मुलांचे भावविश्व उलगडले.