03 डिसेंबर 2023 जागतिक अपंग दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर राजारामपुरी व लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाड यांच्या संयुक्त विद्यमाने हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड या संस्थेमध्ये नेत्र चिकित्सा शिबीर घेण्यात आले. यावेळी लायन्स क्लब प्रांताचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पी एम जे एफ लायन भोजराज नाईक निंबाळकर व रिजन चेअरमन रविकिरण गायकवाड, झोन चेअरमन गौरी देशपांडे, कुरुंदवाड क्लबच्या अध्यक्षा धनश्री गायकवाड, लायन्स क्लब कोल्हापूर राजारामपुरी चे अध्यक्ष अविनाश पेंढुरकर, सेक्रेटरी गिरीश बारस्कर, शुभांगी कुलकर्णी , सदस्य अशोक पटेल , दिगंबर सूर्यवंशी, धनंजय पाटील उपस्थित होते.