हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड संस्थेद्वारा घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला. अपंगांच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी अविरत कार्य करणाऱ्या हेल्पर्सने ४० व्या वर्षात पदार्पण केले आहे. या प्रवासात संस्थेला लाभलेले मार्गदर्शक, संस्थापक, हितचिंतक यांचे कार्य पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी त्यांच्या स्मरणार्थ विशेष उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. सन २०२३-२४ या वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी वक्तृत्व, गायन, नृत्य, अभिनय, क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार आहेत.